अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ

मुंबई – अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास एलआयसी योजनेंतर्गत ठोक एकरकमी लाभ देण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. गेल्या काही वर्षांपासून सतत आंदोलने करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची मागणी अखेर राज्य सरकारने ऐकली. राज्यातील दोन लाख सहा हजार १२५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेनुसार सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेस एक लाख रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकेस अथवा मदतनीसास ७५ हजार रुपये लाभ मिळेल. तसेच निधन झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या कायदेशीर वारसांना एक लाख रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वारसांना ७५ हजार रुपये देण्यात येतील. ही योजना लागू करण्यासाठी एलआयसीला सुरुवातीचे योगदान म्हणून ४९ कोटी रुपये सरकारच्यावतीने देण्यात येतील.

Leave a Comment