बांगलादेश सीमेवर पाच हजार कासवे जप्त

कोलकता- बांगलादेश सीमेवर असलेल्या बोनगावमध्ये पाच हजार कासवे सोमवारी (ता. 3) जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली. वनअधिकारी प्रदीप व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनगावामध्ये चार हजार 980 जिवंत कासवे तिघांकडून जप्त करण्यात आली आहेत.

ही कासवे बांगलादेशमध्ये पाठविण्यात येणार होती. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे. बांगलादेशमध्ये खाण्यासाठी ही कासवे पाठविण्यात येणार होती, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जप्त करण्यात आलेली कासवे लवकरच सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment