टीम इंडियाची आता न्यूझीलंडविरूध्द ‘कसोटी’

ऑकलंड- टीम इंडियाला वनडेत न्यूझीलंडकडून मालिकेत ४-० असा सपाटून मार खावा लागला आहे. त्यानमुळे आता उद़यापासून सुरू होत असलेल्या४ न्यूझीलंडविरूध्द कसोटी मालिकेत टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. गुरुवारपासून पहिल्यास कसोटी सामन्याला ऑकलंडमध्ये सुरुवात होत आहे. परदेशातील खराब कामगिरीत सुधारणा होत नसल्याने ढोणी आणि सहका-यांची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या वनडे मालिका टीम इंडियाने गमावल्याने टीम इंडिया दडपणाखाली आहे. आगामी काळात अपयश विसरून कामगिरीत उंचावण्याचे आव्हान टीम इंडियसमोर असणार आहे. टीम इंडियाच्याे कामगिरीत सराव लढतीत थोडी फार सुधारणा दिसली आहे. त्याआमुळे आता प्रत्यक्ष लढतीतील कामगिरीवरच यशापयश अवलंबून असणार आहे.

कसोटी सामन्याात चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजयच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत झाली आहे. डावखुरा मध्यमगती झहीर खानमुळे वेगवान मारा सशक्त झाला आहे. मात्र फॉर्मात असलेला विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणीसह शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू तसेच रवींद्र जडेजाकडून दमदार फलंदाजी अपेक्षित आहे. झहीरकडे चांगला अनुभव असला तरी उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे आणि ऑफस्पिनर आर. अश्विनकडून त्याला तितकीच चांगली साथ अपेक्षित आहे.
न्युझीलंडविरूद़धच्या वनडे मालिकेत त्रासदायक ठरलेले रॉस टेलर, केन विल्यमसन, कॉरी अँडरसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ड आणि डग ब्रासवेलला कसे रोखायचे, याचा उपाय टीम इंडियाला लवकर शोधावा लागेल. आगामी काळाता होत असलेल्या कसोटी मालिकेत विजयापासून रोखण्यासाठी ढोणी आणि सहका-यांचा कस लागणार आहे.

Leave a Comment