कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात टोलवसुली सुरू

कोल्हापूर – कोल्हापुरात बुधवारी सकाळपासून पुन्हा टोलवसुलीस पोलिस बंदोबस्तात सुरूवात झाली आहे. आयआरबीच्या अधिका-यांनी बुधवारी सकाळी शिरोली टोलनाक्यावर टोलवसुली सुरू केली आहे. आगमी काळात याठिकाणी कोणताही गोंधळ माजून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वीच कोल्हापूर शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाचे पैसे देण्याची जबाबदारी कोल्हापूर महापालिका घेईल, त्यामुळे टोलवसुली बंद झाल्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केल्यानंतरही टोलवसुली सुरूच होती. त्याामुळे संतप्त झालेल्या् शहरातील नागरिकांनी सर्वच भागातील आयआरबीचे टोलनाके पेटवून दिले होते. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हा सर्व घटनाक्रम नकताच घडला असतानाच आयआरबीने मंगळवारी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला पत्र पाठवून टोलवसुलीकरीता पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. त्यानंतर बुधवार सकाळपासून टोलवसुलीस सुरूवात झाली आहे. सर्वच टोलनाक्यावर मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्तन तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment