इंडो-पाक बँडच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा गोंधळ

मुंबई- पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रमाची संधी दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारत-पाक संयुक्त बँडची घोषणा करणारी पत्रकार परिषद मंगळवारी प्रेस क्लबमध्ये उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रचंड पोलिस बंदोबस्त असूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ह्यपाकिस्तानी कलाकारांनो चालते व्हाह्ण, ह्यवंदे मातरम्ह्ण अशा घोषणा देत पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारण्यासाठी ह्यमीकाल हसन बँडह्ण हा वाद्यवृंद प्रेस क्लबमध्ये भारतीय कलाकारांसोबत कार्यक्रम सादर करणार होते. या संदर्भात पाकिस्तानी कलाकारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. भारत व पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत यासाठी प्रेस क्लबने या संयुक्त बँडचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबिर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांना माहिती दिली होती. या कार्यक्रमाचा निषेध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांना होती, त्यामुळे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही याठिकाणी निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी प्रेल क्लबचा मुख्य दरवाचा बंद केल्याचे सिंग यांनी सांगितले.

मात्र यामुळे पाकिस्तानी टिव्ही कलाकार बेगम नवाईश अली, बीग बॉसमधील कलाकार वीणा मलिक आणि गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या सिंधी सुफी संगित महोत्सवात भाग घेतलेले काही कलावंत या परिषदेच्या निमित्ताने आले आहेत. ते सर्वजण सुखरुप असल्याचे सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानी कलाकारांना व खेळाडूंना विरोध करण्याची शिवसेनेची ही जुनीच भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेली ही स्टंटबाजी असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.

Leave a Comment