राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. मुंबई उपनगर ​जिल्हाधिकारी संजय देशमुख यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी तर एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी वेणूगोपाळ रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या करण्यात आलेले अधिकारी आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या पुढीलप्रमाणे- अनुपकुमार ( विभागीय आयुक्त- नागपूर), एस. चोकलिंगम (शिक्षण आयुक्त-पुणे), एकनाथ डवले ( विभागीय आयुक्त- नाशिक), ए. टी. कुंभार ( पशुसंवर्धन आयुक्त-पुणे ), सौरभ राव ( जिल्हाधिकारी-पुणे), ए. एम. कवडे (जिल्हाधिकारी-नंदूरबार), ओमप्रकाश बाकोरिया (जिल्हाधिकारी- जालना), संपदा मेहता (मुख्य कार्यकारी अधिकारी-गडचिरोली), शैलेश नवल (मुख्य कार्यकारी अधिकारी-अहमदनगर), सुमन रावत (मुख्य कार्यकारी अधिकारी- उस्मानाबाद), राहूल द्विवेदी (मुख्य कार्यकारी अधिकारी-भंडारा), आशुतोष सलील (मुख्य कार्यकारी अधिकारी-जालना), अनिल भंडारी (मुख्य कार्यकारी अधिकारी-अमरावती), प्रेरणा देशभ्रतार (मुख्य कार्यकारी अधिकारी-यवतमाळ), आणि उदय चौधरी (मुख्य कार्यकारी अधिकारी-वर्धा). मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी, अद्याप त्या नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Comment