टाटा बिर्लाच नियम पाळत नसतील तर होणार कसे?

नवी दिल्ली – टाटा आणि बिर्ला यांच्यासारखे उद्योगपतीच जर नियम पाळत नसतील आणि कायदे पायदळी तुडवत असतील तर सामान्य माणूस कायदे कसे पाळणार आहे, असा झणझणीत सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने विचारला आहे. टाटा स्पॉंज लिमिटेड या टाटा उद्योग समुहातल्या कंपनीने दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने हा प्रश्‍न विचारला.

या कंपनीने दाखल केलेली ही याचिका नियमांना सोडून आहे. त्यामुळे न्यायालयाने हा शेरा मारला. न्यायमूर्ती मनमोहन यांच्या समोर ही याचिका सुनावणीस आले आहे. आपण या याचिकेला हात सुद्धा लावणार नाही. ती दुरुस्त केली जाईल आणि उच्च न्यायालयाला मान्य असलेल्या पद्धतीनुसार असेल तेव्हाच आपण तिचा विचार करू, असे न्या. मनमोहन म्हणाले.

आपल्यासमोर येणार्‍या अनेक याचिका अशाच नियमांना सोडून असतात. कोणी तरी चांगले उदाहरण घालून दिले पाहिजे, उगाच मोठ मोठे वकील कामाला लावले म्हणजे चालत नाही. अशा प्रकरणातून लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात असतो असेही न्यायमूर्तींनी सुनावले.

Leave a Comment