पुणे मेट्रोला मिळणार महिनाभरात मंजुरी

पुणे- पुणे मेट्रो प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. या प्रकल्पाला महिन्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे मेट्रोसंदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे केंद्र सरकारने महापालिकेकडे मागितली आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मेट्रोला मंजूरी दिली जाणार असल्याेचे विश्वमसनीय सुत्रांकडून समजते. त्यािमुळे आता केंद्राच्या आगामी अंदाजपत्रकात या मेट्रो प्रकल्पाआला निधी मिळण्याची शक्यता आहे.

आागमी काळात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संयुक्तरित्या मेट्रो प्रकल्प राबविणार आहेत. पहिल्या टप्प्यात वनाझ कॉर्नर (कोथरूड) ते रामवाडी तर कात्रज-स्वारगेट ते रामवाडी या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने या प्रकल्पास मंजूरी दिली आहे. त्यानंतर अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव आता केंद्राकडे पोहचला आहे.

एप्रिलमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेधीआ पुणे मेट्रोला मान्यता न दिल्यास भविष्यात हा प्रकल्प आणखी काही वर्षभर रेंगाळू शकतो. तसे झाल्यास या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढणार आहे. असे असले तरी केंद्र सरकार बरेच प्रशासकीय कामाचे निर्णय येत्या महिन्याभरात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मेट्रोला महिन्याभरात परवानगी मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्यातच पालिकांकडून दोन-तीनदा मेट्रोसंबंधी कागदपत्रे केंद्र सरकारने मागवून घेतल्यानेच या महिन्याभरात मंजूरी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment