टीम इंडियात संधी मिळण्याची विनयकुमारला आशा

हैद्राबाद- रणजी सामन्याच्या फायनलमध्येे कर्नाटकाने महाराष्ट्रावर मात केली. या मोसमात विनय कुमारने सातत्यपूर्ण कामगिरी करीत कर्नाटकला विजेतेपद मिळवून दिल आहे. त्याने नुकताच प्रथम श्रेणी सामन्यांमधील तीनशे बळींचा टप्प्पा ओलांडला आहे. त्यालमुळे आगमी काळात या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी मिळण्याची अशा कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार विनयकुमारला वाटते.

याबाबत बोलताना विनयकुमार म्हणाला, ‘आतापर्यंत कर्नाटक संघाने सहा वेळा विजेतेपद मिळविले आहे. २००९-१० च्या अंतिम लढतीत आमची विजेतेपदाची संधी थोडक्यात हुकली होती. त्या वेळीच आगामी काळात विजय मिळविण्याअचा निश्चय करण्यात आला होता. कर्नाटक संघातील सहा खेळाडू सध्याच्या टीम इंडियाच्या संघात खेळत असल्यामुळे मला विजेतेपदाची खात्री वाटत होती. अपेक्षेनुसार आम्ही सर्वच आघाडय़ांवर महाराष्ट्राला नमवले.’

वेगवान गोलंदाजांनी यंदा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाजी हे आमच्या यशाचे मुख्य अस्त्र ठरले आहे. त्यामसोबतच आमच्या फिरकी गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच फलंदाजांनीही या स्पर्धेत यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. लोकेश राहुल या युवा फलंदाजाने यंदा एक हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळेच गोलंदाजा इतकाच फलंदाजांचाही या जेतेपदामध्ये मोठा वाटा असल्याचे यावेळी बोलताना विनयकुमारने स्पष्ट केले.

Leave a Comment