बीजिंग- गौतम बुद्धांची शिकवण आणि वन्यजीव संरक्षण मोहिमेने प्रेरित झालेल्या पाच कोटी चीनी नागरिकांनी मांसाहाराच्या प्रदीर्घ परंपरेला फाटा देत शाकाहाराचा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे साम्यवादी चीन हा जगातील सर्वाधिक वेगाने शाकाहारी बनणारा देश ठरला आहे.

चीनच्या शाकाहारी लोकसंख्येबाबतची अधिकृत आकडेवारी नसली तरी, पब्लिक रेडिओ इंटरनॅशनल या स्वतंत्र सेवाभावी बहुमाध्यम संस्थेने जुलैमध्ये चीनमधील शाकाहारी लोकसंख्या पाच कोटींवर पोचली असल्याचे म्हटले आहे, असे ‘शिनुआ’ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले. शाकाहारींच्या जागतिक संघटनांच्या म्हणण्यानुसार, धर्म आणि संस्कृतीमध्ये शाकाहारी तत्त्व खोलवर रुजलेल्या भारतामध्ये जेवणामध्ये मांसाहाराचा अजिबात समावेश न करणाऱ्यांची संख्या ५० कोटींहून अधिक आहे, असेही ‘शिनुआ’ने म्हटले आहे.