विदेशात पराभूत होवूनही टीम इंडिया अव्वलस्थानी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतत्वाखालील टीम इंडियाला विदेशात एकही विजय मिळवीता आला नाही. तरी पण जागतीक क्रमवारीतील अव्वनल स्थावन टिकून आहे. गेल्या चार वर्षात विदेशात खेळण्यात आलेल्या ११ एकदिवसीय मालिकांपैकी भारताने ९ मालिका गमावल्या‍ आहेत. जिंकलेल्या दोन्ही एक-एक सामान्याची मालिका होती. त्यामुळे टीम इंडियाची विदेशातील कामगीरी विशेष ठरली नाही.

धोनीच्या टीमने विदेशातील मैदानावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्याला सात महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. २३ जून २०१३ रोजी बर्मिंघम येथे टीमने इंग्लंडविरुद्ध पाच धावांनी सामना जिंकला होता. गेल्या चार वर्षांत विदेशात झालेल्या ११ एकदिवसीय मालिकांपैकी भारताने नऊ मालिका गमावल्या आहेत. जिंकलेल्या दोन्ही एक-एक सामान्याची मालिका होती. एक बर्मिंघममध्ये इंग्लंड विरुद्ध आणि दुसरी १९ फेब्रुवारी २०११ रोजी बांगलादेशविरुद्ध ढाक्यातील सामना. घरच्या खेळपट्टीवर धोनीच्या कप्तानीत खेळलेल्या ६० एकदिवसीय सामन्यांपैकी आपण ३६ जिंकले, तर २० सामन्यांत पराभूत झालो.

कसोटी सामन्यात धोनीची कामगिरी खूपच वाईट आहे. त्याच्या कप्तानीत विदेशात खेळलेल्या २१ सामन्यांपैकी आपण फक्त पाच सामने जिंकू शकलो, तर दहा सामने हरलो. सहा सामने अनिर्णीत ठरले. भारतात खेळलेल्या ३० सामन्यांमध्ये धोनीच्या टीमने 21 जिंकले. बहुतांश सामने तर तीन किंवा चार दिवसांतच उरकले. तीन हरले आणि सहा अनिर्णीत. २० जून २०११ रोजी भारताने किंगस्टन येथे वेस्ट इंडीजविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला होता, तर घरच्या खेळपट्टीवर आयोजित १२ कसोटी मालिकांपैकी धोनीच्या टीमने १० जिंकल्या आणि इंग्लंडविरुद्धची एक मालिका १-२ ने गमावली. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या न्युझिलंडविरूध्दची मालिकात टीम इंडियाची कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment