व्हायग्राने जाडी कमी होते

लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी वापरले जाणारी व्हायग्रा ही वनस्पती चांगलीच लोकप्रिय आहे. तिच्यापासून गोळ्या तयार करून आत्मविश्‍वास गमावलेल्या पुरुषांना त्या दिल्या जातात आणि त्यांचा वापर प्रामुख्याने कामशक्ती वाढविण्यासाठीच केला जातो. मात्र या वनस्पतीच्या प्रदीर्घ काळच्या वापरातून आणि त्याच्या परिणामांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, या गोळ्या पुरुषांची जाडी म्हणजेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. विशेषत: पोटाचा घेर वाढून वजन वाढले असेल तर या घेरातली चरबी कमी करण्यास व्हायग्रा उपयुक्त ठरू शकते.

युनिव्हर्सिटी ऑङ्ग बॉन या जर्मनी मधील विद्यापीठात काही संशोधकांनी व्हायग्राचा वापर आणि त्याचे लठ्ठपणावर होणारे परिणाम यावर काही संशोधन केले तेव्हा त्यांना व्हायग्रा चरबीवर गुणकारी असल्याचे आढळले. त्यांनी सुरुवातीला तरी व्हायग्राचे हे प्रयोग उंदरांवर केलेले आहेत. कारण माणसांवर प्रत्यक्ष प्रयोग करणे धोक्याचे होते. हा प्रयोग करताना कधी कधी मोठ्या प्रमाणावर व्हायग्राचा डोस द्यावा लागतो आणि तसा माणसाला दिला तर त्याच्यावर काही गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून हे प्रयोग आधी उंदरांवर करण्यात आले.

त्यांना व्हायग्राचा डोस देण्यात आला, तेव्हा असे आढळले की, व्हायग्रा ही वनस्पती उंदराच्या शरीरातील पांढर्‍या चरबीच्या पेशींवर हल्ला करते आणि या चरबीच्या पेशींना वितळवून टाकते. अशा प्रकारे शरीरातल्या चरबीला संपवण्याचे काम व्हायग्राकडून केले जाते. या चरबीच्या पेशींना स्पेअरटायर असे म्हटले जाते. हा प्रयोग माणसांवर यशस्वी झाला तर त्याच्या शरीरातली चरबी कमी होण्यास आणि लठ्ठपणातून एरवीही निर्माण होणार्‍या काही गुंतागुंती टाळण्यास त्याचा उपयोग होईल. ही सारी माहिती जर्मनीतल्या ङ्गासेब जर्नल या मासिकात प्रसिद्ध झाली आहे.

व्हायग्रातील कोणता घटक चरबीवर ही प्रक्रिया करतो याचा शोध घेतला असता त्यातील स्लायडन ङ्गील हा घटक हे काम करतो, असे दिसून आले. तेव्हा व्हायग्राचे विघटन करून त्यातला केवळ स्लायडन ङ्गील हाच घटक उंदराला टोचण्यात आला. तेव्हा त्याच्या शरीरातली चरबी कमी झाल्याचे आढळले. म्हणजे व्हायग्रा ही वनस्पती चरबी कमी करण्यासाठी पूर्णपणे वापरण्याची गरज नाही. त्यातला हा घटक जरी वेगळा करून वापरला तरी पुरेसे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment