टीम इंडियाच्या पराभवाला मधली फळी जबाबदार – धोनी

वेलिंग्टन, – टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळावर सर्वबाजूनी टीका केली जात आहे. टीम इंडियाच्या पराभवाला मधल्या फळीचे अपयश जबाबदार असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्य्क्तू केले आहे. त्या उलट केन विल्यमसन व रॉस टेलर या मधल्या फळीतील फलंदाजांनी न्यूझीलंडसाठी सातत्याने धावा केल्या असताना टीम इंडियाच्या फलंदाजांकडून निराशेला सामोरे जावे लागले, असल्याचे धोनीने यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला, या मालिकेतील बहुतांशी लढतींत आम्हाला मोठ्या धावसंख्येचाच पाठलाग करावा लागला. अखेरच्या १५ ते २५ षटकांमध्ये ८ ते १० च्या सरासरीने धावा काढणेही डोईजड असते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यांत गोलंदाजी केली असली तरी मधल्या फळीतील खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान आठ हजार धावा तडकावणारा धोनी चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने २१४ डावांमध्ये हा टप्पा ओलांडलाय. याआधी सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा या तिघांना अशा प्रकारची कामगिरी करता आलेली आहे.

Leave a Comment