राष्ट्रवादी कॉग्रेसची अस्वस्थता वाढली

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वाभूमीवर येत असलेले विविध जनमत चाचण्यांचे निष्कर्ष पाहता राष्ट्रवादी कॉग्रेसची अस्ववस्थता वाढली आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्यां पाश्वेभूमीवर कॉंग्रेससोबतच्या आघाडीचा अद्याप न झालेला निर्णय यामुळे या अस्वस्थेत दिवसेंदिवस भर पडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या‍ टोल आकारणी करणा-या कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यात सरकारला अपयश आले आहे. टोलच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलन करत असून आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसऐवजी सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या पहिल्या सभेला झालेली तुडुंब गर्दी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी विरोधकांची केलेली एकजूट यामुळे राष्ट्रवादीची धास्ती वाढली आहे. याबाबतही आगामी काळात होत असलेल्या राष्ट्रावादी कॉग्रेंसच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.