टीम इंडियावर व्हाईट वॉशचे संकट

वेलींगटन- भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात किवींनी तुफान फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ३०४ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर रोहीत शर्मा अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. त्यापाठोपाठ शिखर धवन ९ आणि अजिंक्य रहाणे २ तर अंबाती रायडू २० धावांवर माघारी परतले आहेत. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा टीम इंडियाने ५ गडी बाद १५३ धावा केल्याय होत्या.

सुरुवातीच्या २० षटकानंतर भारताची धावसंख्या ५० वरच आहे. २० षटकानंतर भारताची धावसंख्या ५० वरच आहे. सुरूवातीलाच एक फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्याने भारतीय संघावर दबाव निर्माण करण्यात न्यूझीलंड गोलंदाजांना यश आले आहे.भारतीय फलंदाज संयमी फलंदाजी करत आहेत. परंतु, ३०३ धावांचे आव्हान गाठण्यासाठी भारतीय फलंदाजांना दबावाखाली न खेळता आक्रमक फलंदाजी करावी लागेल.

न्यूझीलंडकडून यावेळीही रॉस टेलरची जादू पहायला मिळाली. रॉस टेलरने १०६ चेंडूत १०२ धावा ठोकल्या. त्याला विल्यमसनने साथ देत ८८ धावा कूटल्या. भारतीय गोलंदाजांनाकडून वरूण अॅरोनने २ तर, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतले.

Leave a Comment