नोकियाचा नॉर्मंडी अँड्राईड फोन लवकरच येणार

नोकिया कंपनीचा पहिलावहिला अँड्राईड फोन २४ फेब्रुवारीला सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे. नॉर्मंडी असे त्याचे नामकरण केले गेले आहे.व्हिएटनामी वेबसाईटवर त्यांचे कांही वेळासाठी दर्शन झाले मात्र नंतर तो लगेचच वेबसाईटवरून काढून टाकला गेला असल्याचे सांगितले जात आहे. फिनिश कंपनी नोकियाच्या या फोनसंदर्भात आजपर्यंत खूप बोलले गेले आहे, ऐकले गेले आहे अथवा वाचले गेले आहे.

नोव्हेंबर २०१३ मध्येच नोकिया अँड्राईड फोनवर काम करत असल्याचे वृत्त आले होते मात्र त्यापाठोपाठच कंपनीने हा प्रकल्प थांबविला असल्याचेही सांगितले गेले होते. मात्र आता हा फोन बाजारात दाखल होत आहे. चार इंची स्क्रीन,,४ जीबी इंटर्नल स्टोरेज, ५ मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल सिम, आणि अॅंड्राईड ४.४ किटकॅट ही गुगलची लेटेस्ट ऑपरेटिग सिस्टीम अशी त्याची वैशिष्टे सांगितली जात आहेत. विशेष म्हणजे या फोनवरून युजर गुगल प्ले स्टोअर अॅक्सेस करू शकणार आहेत.

Leave a Comment