रणजीमध्ये महाराष्ट्राची टॉस जिंकून पहिली बॅटिंग

हैदराबाद- हैदराबादमध्ये बुधवारी सकाळी रणजी स्पर्धेच्या फायनलला सुरुवात झाली. यावर्षी कर्नाटकासोबत फायनलमध्ये महाराष्ट्राचा मुकाबला रंगणार आहे. फायनल सामन्यात महाराष्ट्राने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आधी १९३९-४० आणि १९४०-४१ मध्ये महाराष्ट्राने रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी दिग्गज टीम्सना पराभवाची धूळ चारत महाराष्ट्राने रणजीच्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात महाराष्ट्राचा संघ विजय मिळवेल अशी सर्वांना अशा आहे.

यावेळेसच्या रणजी सामन्यात पहिल्यांदा मुंबईचा मुंबईत पराभव करत, आणि नंतर बंगालचा धुव्वा उडवत महाराष्ट्राने या स्पर्धेत विजेतेपदावर दावा भक्कम केला आहे. महाराष्ट्राचे बॅट्समन आणि बॉलर्स सर्वजण यावर्षी उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची कामगिरी यावेळी अव्वल राहिली आहे. त्यामुळे टीम महाराष्ट्राकडून आता सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.