पुण्यात बनतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

पुणे – महराष्ट्रात प्रथमच शिवाजी महाराजांवर बनत असलेल्या खुल्या संग्रहालयात बसविण्यात येणारा ६ मीटर म्हणजे जवळजवळ १८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा भव्य पुतळा पुण्यातील कलाकार शरद कापुरकर यांच्या हातून साकारला जात आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्यानेच सुरू झालेल्या टर्मिनल दोनच्या बाहेर, नवीन सहार इलेव्हेटेड रोडजवळ हे खुले संग्रहालय उभारले जात आहे. ते पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल असे सांगितले जात आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे हे संग्रहालय आकारास येत आहे. कापूरकर यांच्याकडे महाराजांचा भव्य पुतळा उभारणीचे काम दिले गेले असले तरी करारामुळे या संबंधी अधिक माहिती देता येणार नाही असे कापूरकर यांनी सांगितले. हा पुतळा बनण्यास आणखी किमान तीन महिने लागतील असे ते म्हणाले. ५ हजार चौरस मीटरच्या जागेच उभारण्यात येत असलेल्या या संग्रहालयात महाराजांच्या पुतळ्याबरोबरच महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वस्तू ठेवल्या जाणार आहेत. येथून होणार्‍या विमानउड्डाणांना अडथळा होऊ नये अशा रितीने हा पुतळा बसविला जाणार आहे असेही समजते.

Leave a Comment