व्होल्व्हो – डिझेल टँकर टकरीत ८ ठार

पुणे – पुण्याहून अहमदाबादकडे जाणार्‍या व्होल्व्हो आणि भारत पेट्रोलियमच्या डिझेल टँकर यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत बसमधील ८ जण ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मनोर जवळ बुधवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक तीन तासांपेक्षा अधिक वेळ बंद होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने एकमेकांवर धडकल्यानंतर दोन्हीही वाहने पेटली. बस पूर्ण जळाली असून मृतांचे देहही पूर्ण जळाल्याने ओळख पटू शकलेली नाही. संबंधित बस कंपनीकडून प्रवाशाची नावे मिळविण्याचे आणि ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओळख पटल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात येणार आहेत.

गतवर्षी २९ मे रोजी या अपघातस्थळापासून जवळच लक्झरी बस आणि टँकर यांचा असाच अपघात होऊन त्यात १४ जण ठार तर ४० जण जखमी झाले होते असेही समजते.

Leave a Comment