टीम इंडियावर न्यूझीलंडचा सात गडी राखून विजय

ऑकलंड- न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियावर सात विकेट्सने मात करत किवींनी ही एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत न्युझीलंडसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवले होते. रॉस टेलरच्या शतकामुळे न्युझिलंडने ही मालिका जिंकली.

सुरवातील टीम इंडियाच्या गोलंदाजानी भेदक मारा केला होता. किवींच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडण्यात टीम इंडियाला यश आले. परंतु, रॉस टेलर आणि केन विल्यम्स कर्दनकाळ ठरले. दोघांनी शतकी भागिदारी करत टीम इंडियाची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. मध्यात रविंद्र जडेजाला ही भागिदारी भेदण्यात यश आले. त्यावेळसही भारतीय संघाच्या विजयी आशा कायम होत्या. परंतु, त्यानंतर रॉस टेलरने आपला आक्रमकपणा कायम राखत नाबाद ११२ धावांची खेळी साकारली.

टेलरला कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने उत्तम साथ देत त्यानेही ४९ धावांची नाबाद खेळी रचत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे न्यूझीलंड संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघावर ७ विकेट्स राखून २७९ धावांचे आव्हान सहज गाठले आणि मालिकाही जिंकली.

पराभवाच्या दुष्काळातून न्यूझीलंडच्या दौ-यावर भारतीय संघ बरोबरीच्या वाटेवर येऊन ठेपला होता. कामगिरीत सुधारणा जरी झाली असली तरी यापुढील दोन्ही सामने जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा त्यांच्यापुढे पर्याय भारतीय संघासमोर होता. परंतु, न्यूझीलंडचा संघ भन्नाट फॉर्मात असल्याने टीम इंडियाला मालिकेत पराभव पत्करावा लागला.

Leave a Comment