उ. कोरियात चांग सांग यांच्या कुटुंबियांनाही मृत्यूदंड

उत्तर कोरियाचा नेता किम जुंग आन याने काका चांग सांग यांना गेल्याच महिन्यात फासावर चढविल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून ठार केले असल्याचे वृत्त आहे. चांग सांग थायक यांच्या सर्व परिवाराला घराबाहेर खेचून गोळ्या घातल्या गेल्या असल्याचे समजते. त्यात त्यांचे भाऊ, मुले आणि नातवंडे यांचाही समावेश आहे.

कांही दिवसांपूर्वीच किम जुंग यांनी काका चांग सांग यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना फासावर लटकविले होते. द. कोरियातील वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार ६७ वर्षीय चांग सांग यांना भुकेल्या रानटी कुत्र्यांसमोर फेकले गेले आणि कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडून त्यांना ठार केले. चांग सांग कोरियातील बलाढ्य नेते समजले जात होते मात्र लष्करी न्यायालयाने त्यांच्यावर सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवताच त्यांना देशद्रोही ठरवले गेले आणि ठार केले गेले.

Leave a Comment