मुलांसाठी आला शैक्षणिक टॅब्लेट एडी

मेटीस कंपनीने २ ते १० वयोगटातील मुलांसाठी एडी नावाने शैक्षणिक टॅब्लेट तयार केला आहे. चीममध्ये तयार केलेल्या या टॅब्लेटची किंमत ९९९९ इतकी असून तो २० फेब्रुवारीला बाजारात दाखल होणार आहे. मुलांना कांही ना कांही शिकता यावे असे अनेक कंटेंट यात समाविष्ट केले गेले आहेत. शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित असे १५० गेम्सही यांत अंतर्भूत केले गेले आहेत. याच्या सहाय्याने मुलांना खेळणे, पुस्तके वाचणे याबरोबरच जगातील ज्ञानही मिळणार आहे.

या टॅब्लेटसाठी उपयुक्त अशी अन्य अॅप पालक गुगल प्ले स्टोअरमधून खरेदी करू शकणार आहेत तसेच या टॅब्लेटला किडस रडार नावाचे सर्च इंजिन दिले गेले आहे. विशेष म्हणजे पालक या टॅब्लेटमध्ये मुलासाठी टाईम सेट करू शकतील तसेच कोणते विषय हवेत तेही सेट करू शकतील. ७ इंची स्क्रीन असलेल्या या टॅब्लेटला फ्रंट आणि रिअर कॅमेरा, अॅड्राईड जेली बिन ४.२ ऑपरेटिंग सिस्टीम, ८ जीबीची इंटर्नल मेमरी दिली गेली आहे. भारतात इंटेल ही चीपमेकर कंपनीही अशाच प्रकारचा टॅब्लेट आणण्याचा प्रयत्न करत आहे.