इंटरनेटमुळे हवेत कर्बवायू

इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणावर वाढत चालला आहे. इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर कॉलसेंटर, बीपीओ या सगळ्या उद्योगांचे अन्य उद्योगांपेक्षा असलेले वेगळेपण सांगत असताना या क्षेत्रातले लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की, या व्यवसायातून कसलेही प्रदूषण होत नाही, हवेत विषारी वायू सुटत नाहीत, कसलेही सांडपाणी बाहेर पडत नाही वगैरे, परंतु नव्याने बाहेर पडलेली माहिती काही वेगळेच सांगत आहे.

इंटरनेटच्या वापरातून कार्बन डाय ऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतो असे आता लक्षात आले आहे. सेंटर ङ्गॉर एनर्जी एङ्गिशियंट कम्युनिकेशन्स या संस्थेच्या संशोधकांनी ही नवी माहिती समोर आणली आहे. सध्या जगभरामध्ये ८३० दशलक्ष टन एवढा कर्ब वायू इंटरनेटच्या माध्यमातून बाहेर टाकला जातो असे या संस्थेचे म्हणणे आहे. कर्ब वायू हा घातक अशा ग्रीन हाऊस गॅसेसचा एक भाग आहे आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला गती मिळते आणि असा हा कर्ब वायू इंटरनेटमधून बाहेर पडण्याचे प्रमाण २०२० सालपर्यंत दुप्पट होईल, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

इंटरनेटच्या वापरातून बाहेर पडणारा हा कर्ब वायू जगातल्या एकूण कर्ब वायूच्या केवळ दोन टक्के एवढा असला तरी त्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. जगभरातल्या विमान कंपन्यांच्या विमानातूनसुध्दा इंटरनेटएवढाच कर्ब वायू हवेत सोडला जात असतो. असे असले तरी शास्त्रज्ञांनी हा इशारा देतानाच कर्ब वायूचे हे प्रमाण आणखी कसे कमी करता येईल यावरही काही उपाय सुचविले आहेत आणि त्यादृष्टीने इंटरनेटचे वेगळे मॉडेल विकसित करावे लागेल असे म्हटले आहे. कमी कर्ब वायू उत्सर्जित करणारे इंटरनेटचे मॉडले विकसित करता येऊ शकते असाही त्यांचा दावा आहे.

अशा प्रकारच्या दोन नव्या मॉडेलांचे परीक्षणसुध्दा करण्यात आले आहे. त्या मॉडेलमध्ये इंटरनेट चालविण्यासाठी लागणारे विजेसारखे इंधन बदलावे लागणार आहे. एकंदरित इंटरनेटमुळे जगाचा विकास झाला असे आपण कितीही म्हणत असलो तरी विकासाचे हा कर्ब वायू हे एक विषारी ङ्गळच आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment