सानिया मिर्झा मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत

मेलबर्न, – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने होरिआ टेकूसह धडक मारली आहे. सानिया व हिरोआने जर्मिला गाजडोसोवा आणि मॅथ्यू एब्डेन यांचा २-६, ६-३, १०-२ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानमुळे आता सर्वांचे फायनल सामन्याहकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वीच्या सामन्यानत महिला दुहेरीतील पराभवानंतर सावरलेल्या सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताची सानिया मिर्झा व रोमानियाचा होरिया टिकाऊ या जोडीने उपांत्यपूर्व लढतीत शानदार विजय मिळवला. या सहाव्या मानांकित जोडीने लढतीत पाकिस्तानचा ऐसाम-उल-हक कुरेशी आणि ज्युलिया जॉर्जला ६-३, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. इंडो-रोमानिया जोडीने अवघ्या ६३ मिनिटांत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

चौथी मानांकित चीनची खेळाडू ली नाने कॅनडाची युवा खेळाडू युजिनी बुकार्डला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सरळ सेटमध्ये ६२,६-४ने मात दिली. यासह मागच्या चार वर्षांत तिने तिस-यांदा फायनलमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला. मागच्या वर्षी फायनलमध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाकडून ली नाचा पराभव झाला होता. यामध्ये किम क्लिजस्टर्सने तिला फायनलमध्ये मात दिली.

Leave a Comment