राहुल गांधींवर टकलू भडकले

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दाखविलेली आक्रमकता त्यांच्या चांगलीच अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली व त्यांचा उल्लेख विरोधी पक्षांचे काम म्हणजे टकल्यांना कंगवा विकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.

राहुल यांच्या या विधानावर महाराष्ट्रातील टकलूंनी आक्षेप घेतला असून राहुल यांचे हे उद्गार म्हणजे अखिल टकलूंचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले आहे. राहुल यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी अमरावती येथील टकलू लोकांनी चक्क मोर्चा काढला आणि राहुल यांच्या निषेधाचे पत्र उपजिल्हाधिकार्यांोना दिले असल्याचे समजते..

या मोर्चाचे प्रमुख म्हणाले की टक्कल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात संबंधित माणसाचा कांही दोष नाही. तरीही त्यांच्या भावनांची दखल न घेता अशी टीका करणे म्हणजे टक्कलवाल्यांचा अपमान आहे. ही एकप्रकारे टकलू लोकांची चेष्टाच आहे. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करतो आहोत.