तुमचा पासवर्ड या यादीत नाही ना?

संगणक, एटीएम, इंटरनेट बँकींग या सारख्या गोष्टी ऑपरेट करताना पासवर्ड द्यावा लागतो आणि हा पासवर्ड दुसर्‍यांना कळू नये यासाठी काळजीही घ्यावी लागते. तरीही जगभरातील हॅकर पासवर्ड हॅक करतात. अमेरिकी सुरक्षा कंपनी स्प्लॅशडेटाने २०१३ सालात सर्वाधिक हॅक  केल्या गेलेल्या २५ पासवर्डची यादीच जाहीर केली असून तुमचा पासवर्ड या पैकी असेल तर तुमचा डेटा चोरीची शक्यता अधिक असल्याचा इशारा दिला आहे.

या यादीत सर्वाधिक धोकादायक पासवर्ड म्हणून १२३४५ हा आकडा दिला गेला आहे. स्प्लॅश डेटाचे सीईओ मॉर्गन स्लेन म्हणतात, पासवर्ड ठरविताना ज्या कंपनीत आपण काम करतो, त्याच्याशी संबंधित पासवर्ड देऊ नये, उदाहरण द्यायचे तर अॅडोबमध्ये काम करत असू तर अनेकजण अॅडोब १२३ असा पासवर्ड देतात ते टाळायला हवे.

१२३४५ या प्रमाणेच १ ते नऊ यामधले आकडे ओळीने देणे या प्रकारचे पासवर्डही वारंवार वापरले जातात. फोटोशॉप, अेबीसी १२३, ११११११, आय लव्ह यू, अॅडोब १२३, अॅडमिन, लेटमिन, मंकी, शॅडो, सनशाईन, पासवर्ड, प्रिन्सेस, ट्रस्ट नंबर १, किवा सहा वेळा शून्य असे पासवर्ड धोकादायक म्हणून या यादीत दिले गेले आहेत.

Leave a Comment