कर्णधार धोनीने दिला रैनाला सल्ला

ऑकलँड- सलग दोन सामन्यात न्यूझिलंडकडून पराभव स्वीेकारावा लागल्याने टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगलाच नाराज झाला आहे. बॅट्समनला यशासाठी योग्य शॉटची निवड हे अत्यंत गरजेचे आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं न्यूझीलंड दो-यातील दुस-या वनडेमध्ये १५ रन्सनी झालेल्या पराभवानंतर सुरेश रैनाला सल्ला दिला आहे.

दुस-या सामन्याेत विराट कोहली ३०व्या ओव्हरमध्ये आऊट झाल्यानंतर सर्वांच्या नजरा या धोनी आणि रैनावर होत्या. रैनानं २२ बॉल्सवर ३५ रन्स बनवले आणि एक खराब शॉट मारून स्वत:ची विकेट गमावली. रैनाच्या बॅटिंगबाबत अखेर धोनी बोलला, “रैना आक्रमक बॅटिंग करतो. मात्र आपल्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्याला हे माहिती हवं की आपण कोणत्या दिशेला शॉट मारतोय. जर त्याबाजूला हिट करणं कठीण आहे तर मग दुस-या पर्यायावर पण विचार करायला हवा, जर आपला शॉट तसा लागू शकत नसेल तर मोठा शॉट मारण्याची गरजच नाही”.

धोनी म्हणाला, या मॅचमध्ये रैनानं खराब बॉलवर चांगले शॉट मारले. अपेक्षा आहे की यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला असले. सुरेश रैना अजून काही काळ सहाव्या नंबरवरच खेळायला येणार, असा याचा अर्थ लावायचा का? धोनी पुढे म्हणतो आम्हाला काही बाबतीत विचार करायला हवा. मात्र प्रत्येक मॅचसाठी रणणिती बदलता येणार नाही.

Leave a Comment