भाजपच्या पहिल्या यादीत मुंडे, गडकरींची नावे असणार

मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. त्यात
तीन ते चार विद्यमान खासदारांचा समावेश असेल. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या दोन नावे असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सध्या भाजपाचे नऊ खासदार आहेत. त्यापैकी बहुतेकांना पुन्हा संधी दिली जाणार असली तरी पहिल्या यादीत सगळ्यांचा समावेश नसेल. या यादीत वेगवेगळ्या समाजाला भाजपा कसे प्रतिनिधित्व देत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न राहील, असे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी उमेदवार लवकर जाहीर करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे , माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी (नागपूर) यांचे नाव पहिल्याच यादीत राहील. भाजपाच्या राज्य निवडणूक समितीची बैठक प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होईल. समितीमध्ये नावे निश्चित करून केंद्रीय समितीकडे पाठविली जातील. केंद्रीय समितीच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असलेल्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर केली जाणार असल्यााचे समजते.

Leave a Comment