केजरीवालापेक्षा राखी सावंतने चांगले राज्य केले असते- शिवसेना

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षावर कोणताच राजकीय पक्ष टीका करण्याळची संधी सोडत नाही. महाराष्ट्रामतील मोठा पक्ष असलेल्याय शिवसेनेने ही आपवर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातून त्यां्नी केजरीवाल यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते असे म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेच्यार मुखपत्रातून केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे, असे म्हमटले आहे. कारण केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

मुंबईत पार पडलेल्या शिवसनेच्या शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसवर प्रहार केल्यानंतर, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी देखिल लोकभावनाच बोलून दाखवली असल्याचे म्हणत, ‘केजरीवाल हा येडा मुख्यमंत्री आहे’, या विधानालाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्या,मुळे आता आगामी काळात नवीन वाद उत्पआन्नम होणार आहे.