मृत्यपत्रावरची सही शिवसेनाप्रमुखांचीच – डॉ.पारकर

पुणे – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कथित १०० कोटी रूपये मालमत्तेवरून ठाकरे बंधूतील वाद न्यायालयात गेला असतानाच बाळासाहेबांवर दीर्घकाळ उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनी केलेल्या खुलाशाने या वादात नवा ट्वीस्ट आला आहे.

डॉ. पारकर यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे यांनी जेव्हा मृत्यूपत्र तयार केले तेव्हा पारकर तेथे उपस्थित होते. मृत्युपत्रावर ठाकरे यांनी त्यांच्यादेखतच सही केली असून बाळासाहेब त्यावेळी पूर्णपणे शुद्धीवर होते. ठाकरे यांच्या घराबद्दल आम्हाला आदर आहे असे सांगतानाच मृत्यूपत्रावर उठलेले वादळ हा त्यांच्या घरातील प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. पारकर यांनी अधिक बोलण्यास नकार दर्शवितानाच सह्या करताना ते स्वतः व बांद्रयातील वकील डिसूझा हेही तेथे उपस्थित होते असे सांगितले आहे

पारकर यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांनी १३ डिसेंबर २०११ राजी हे मृत्यपत्र तयार करून त्यावर सही केली आणि नंतर ११ महिन्यांनी त्यांचे निधन झाले. हे मृत्यूपत्र प्रमाणित करण्यासाठी उद्धव यांनी मुंबई उच्चन्यायालयात प्रोबेट दाखल केले असून बाळासाहेबांचे दुसरे पुत्र जयदेव यांनी मृत्यपत्रालाच आक्षेप घेतला आहे. मृत्युपत्रावरील सही बाळासाहेबांची नाही असे त्यांचे म्हणणे असून पितृक संपत्तीतील हिस्सा त्यांनाही मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Comment