कर्करोग प्रतिबंधक औषध स्वस्त होणार

सरकारने तीन कर्करोग प्रतिबंधक औषधे स्वस्त करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. काही कंपन्यांना ही औषधे तयार करण्याची अनुमती आणि परवाना देण्यात येत आहे. तसे पाहिले तर सरकार औैषधे तयार करणार्‍या कंपन्यांना असे परवाने देतच असते पण, आता कर्करोगाच्या तीन औषधांना दिली जाणारी परवानगी आगळी वेगळी आहे. या औषधांची पेटंटस् परदेशातल्या काही कंपन्यांनी घेतलेली आहेत. पेटंट विषयक नियमानुसार ती औषधे पेटंट बाळगणार्‍या कंपन्यांनाच तयार करता येतात आणि त्यांनाच तशी परवानगी देता येेते. पेटंट नसणार्‍यांना ती तयार करता येत नाहीत आणि केलीच तर त्यांना शिक्षा होते पण आता सरकार या कायद्याला अपवाद करून कंपल्सरी लायसन्सच्या तत्त्वाने तीन औषधे तयार करण्याची अनुमती तीन कंपन्यांना देणार आहे.

सरकारला असा नियमाला अपवाद करता येतो. एखादे औषध पेटंट बाळगणार्‍या कंपनीला न सांगता आणि तिची अनुमती न घेताही तयार करण्याची अनुमती देता येते. ती औषधे त्या पेटंट धारण करणार्‍या कंपन्या तयार करतात पण त्यांना त्यांची मक्तेदारी मिळाली की तिचा गैरङ्गायदा घेऊन या कंपन्या त्यांच्या औषधांच्या किंमती वाटेल तशा वाढवतात. त्यांची मक्तेदारी आणि नङ्गेखोरी यांना आळा घालण्यासाठी सरकार आपला अधिकार वापरून ही औषधे तयार करण्याचा अधिकार पेटंट नसणार्‍या कंपन्यांनाही देते आणि ती औषधे स्वस्त होतात.

गेल्या वर्षी असाच प्रकार नेक्झावार या गोळी बाबत झाला होता. कर्करोगावर गुणकारी ठरणारी ही गोळी पेटंट तयार करणार्‍या कंपनीने इतकी महाग केली होती की महिनाभर गोळ्या घेतल्या की एक लाख रुपये लागत असत. सरकारने ही गोळी तयार करण्यासाठी पेटंट नसणार्‍या कंपन्यांना प्रोत्साहन दिले आणि याच गोळ्या आता आठ हजारात मिळायला लागल्या. आता सरकारने याच प्रकारात तीन कंपन्यांना पेटंट धारक कारखानदारांची अनुमती न घेता परवानगी देण्यात आली आहे. ही तीन औषधे परदेशी कंपन्याच तयार करू शकत होत्या पण आता सरकारने त्यांच्याशिवाय काही कंपन्यांना परवाने दिल्याने ही औषधे सुमारे १२ ते १५ पटीने कमी होतील असा कयास आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment