सोशल नेटवर्कींग साईटमधील सध्याच्या सर्वात लोकप्रिय फेसबुकची लोकप्रियता २०१७ पर्यंत ८० टक्यांनी घटलेली असेल असा निष्कर्ष प्रिन्स्टन विद्यापीठातील मेकनिकल अॅन्ड एरोस्पेस विभागातील तज्ञांनी काढला आहे. ऑनलाईन सोशल नेटवर्कींग साईट संदर्भात या तज्ञांनी काही निरीक्षणे नेांदविली असून त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यासाठी गुगल सर्च क्वेरीच्या आकडेवारीचाही वापर केला गेला आहे.
या तज्ञांच्या मते संसर्गजन्य आजार आणि सोशल नेटवर्क साईट यांच्यात अनेक साम्ये आहेत. संसर्गजन्य आजारात संसर्ग वेगाने होतो, कांही काळ तो तसाच राहतो आणि मग आजाराला उतार पडतो. तसेच सोशल नेटवर्क साईटचेही आहे. मायस्पेस ही सोशल नेटवर्क साईट २००३ साली आलेली पहिली साईट होती. ती खूपच वेगाने लोकप्रिय झाली व २००८ सालात ती नंबर १ वर होती. मात्र २०११ पासून तिची लोकप्रियता वेगाने घसरणीस लागली आहे. सोशल साईट सुरू करण्यामागे केवळ शैक्षणिक हेतू नसतो तर त्यातून मिळणारा पैसा हाही हेतू असतो.
फेसबुकचा प्रवासही याच दिशेने सुरू आहे. सध्या ती एक नंबरची साईट आहे मात्र आता हळूहळू तिची लोकप्रियता घटू लागल्याचे संकेत मिळत असून ही लोकप्रियता २०१५ ते १७ या काळात ८० टक्के घसरण्याचे चान्सेस आहेत.