अजित पवारांच्या महाविद्यालयाला मोफत वीज

पुणे – राज्यात विजेची टंचाई असताना आणि सर्वसामान्य ग्राहकांना भरमसाठ दराने वीजबिले दिली जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्याजवळच्या हडपसर येथील महाविद्यालयाला गेली ५ वर्षे वीजबिलच दिले गेले नसल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पवार यांचे पूर्ण नियंत्रण असलेल्या अप्पासाहेब महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि वीज बोर्डाच्या दोषी अधिकार्यांअवर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

या संबंधी माहिती देताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले गेली पाच वर्षे वरील महाविद्यालयाला वीज बिल दिले गेलेले नाही. या महाविद्यालयावर पवार यांचेच नियंत्रण असल्याने त्यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. ही बाब उघडकीस आली नसती तर आणखी ५० वर्षेही येथे मोफत वीज पुरविली गेली असती. महावितरणच्या अधिकार्‍यांनी या संदर्भात चूक झाल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच गेल्या पाच वर्षांचे वीजबिल वसूल केले जावे अशी आमची मागणी आहे.

Leave a Comment