सचिन देणार क्रिकेटचे धडे

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता एका खासगी कंपनीने करारबद्ध केलेल्या युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देताना दिसणार आहे. ‘अदिदास’ या कंपनीने देशभरातील 11 युवा क्रिकेटपूटंची निवड केली आहे. या क्रिकेटपटूंसाठी सचिन मेटॉर म्हणून काम करणार आहे.

अदिदासने उन्मुक्त चंद, परवेझ रसूल, विजय झोल, मनन व्होरा, मनप्रीत जुनेजा, रूश कलारीया, चिराग खुराणा, अकाशदीप नाथ, विकास मिश्रा, सरफराज खान आणि बाबा अपराजित या खेळाडूंना करारबद्ध केले आहे. यापूर्वी कंपनीने विराट कोहली, सुरेश रैना व रोहित शर्मा या खेळाडूंना करारबद्ध केले होते. आता या अकरा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्याची जबाबदारी कंपनीने सचिनवर टाकली आहे.याबाबत सचिन म्हणाला, ”खेळाच्या भविष्यासाठी या कंपनीने सुरू केलेला हा उपक्रम चांगली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे खेळाडूंनाही प्रेरणा मिळते. युवा खेळाडूंना प्रशिक्षण देताना मलाही आनंद होत आहे.”

Leave a Comment