जासूसीसाठी उपयुक्त स्मार्टफोन अॅपस

सर्वसाधारण दिसणार्‍या वस्तू किती कमालीच्या असू शकतात हे जाणून घ्यायचे असेल तर स्मार्टफोनकडे पाहायला हवे. स्मार्टफोनसाठी बनविली जात असलेली अनेक अॅप असे चमत्कार दाखवित आहेत. स्मार्टफोनसाठी बनलेली हेरगिरी किवा जासूसी अॅप हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. गुगलच्या प्ले स्टोअरवर अशी सात अॅप उपलब्ध आहेत.

अल्ट्रा स्पाय कॅमेरा हे असेच एक अॅप असून याच्या मदतीने हाय क्वालिटी फोटो दुसर्‍याच्या नकळत काढता येतात. म्यूट करूनही हा फोन वापरता येतो तसेच स्क्रीन डिस्प्ले न करताही हे अॅप सुरू करता येते.अॅटोमॅटिक कॉल रेकॉर्डर अॅपच्या सहाय्याने येणारा तसेच केलेला प्रत्येक कॉल रेकॉर्ड करता येतो व नंतर ऐकता येतो. विशेष म्हणजे या सर्व कॉलना पासवर्डही घालता येतो त्यामुळे आपला फोन दुसर्‍याने घेतला तरी आपली प्रायव्हसी कायम राखता येते. आयपी कॅम व्हयूअर लाईट अॅपमुळे आपल्या जवळपास छुपा कॅमेरा असेल तर त्वरीत समजू शकते.

रिमोट कॉल एसएमएस ट्रॅकर अॅपच्या मदतीने आपले कॉल आणि एसएमएस कुठूनही ट्रॅक करता येतात, अॅप लॉक अॅपच्या सहाय्याने आपल्या स्मार्टफोनवर कोणकोणती अॅप आहेत हे दुसर्‍यांना समजणे अवघड बनते तर स्पाय कॉल रेकॉर्डरच्या सहाय्याने आपण कुणाचेही बोलणे एमपी थ्री फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो. एम स्पायमुळे स्मार्टफोनचा वापर मायक्रोफोनसारखा करता येतो. ज्यांचे बोलणे आपल्याला समजावे असे वाटते तेथे हा फोन फक्त ठेवायचा आपण तेथील सर्व संभाषण ऐकू शकतो. तर इअर स्पायमुळे लपून छपून दुसरयाचे बोलणे ऐकणे शक्य होते.

Leave a Comment