मेंदूच्या विकासासाठी औषध

मागची पिढी नेहमीच पुढच्या पिढीला काही ना काही तरी दोष देतच असते. सध्या तरुण पिढी टी.व्ही., कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या आहारी गेलेली आहे, मैदानावर खेळण्याची सवय गेलेली आहे, त्यांना गणिते करण्याची सवय राहिलेली नाही आणि वाचण्याची आवड तर बिल्कुलच राहिलेली नाही. अशी मुक्ताङ्गळे नेहमी ऐकायला येतात. वाचनाची आवड नसल्यामुळे किंवा वाचनाची गरजच नसल्यामुळे या पिढीच्या मेंदूची वाढ कमी झाली आहे, असे वयस्कर लोकांना वाटते.

एका बाजूला ही टीका ऐकायला येते तर दुसर्‍या बाजूला आजची नवी पिढी ङ्गार हुशार आहे, अशी प्रशंसाही केली जाते. यातले नेमके खरे काय, याचा वस्तुनिष्ठ विचार केला असता असे लक्षात येते की, आजची पिढी मोबाईल, इंटरनेट यांच्या वापराच्या बाबतीत हुशार आहे. परंतु वाचनामुळे होणारी मेंदूची विशिष्ठ वाढ विशेषत: विचार क्षमता या बाबतीत ही पिढी मागे आहे. अर्थात सध्याच्या जगात प्रत्येक गोष्टीवर संशोधन केले जाते. तसे मेंदूच्या या क्षमतेची वाढ करण्याच्या बाबतीतही संशोधन केले गेलेले आहे. त्यानुसार संशोधकांनी एक औषध शोधून काढले आहे.

त्या औषधामुळे वाचना अभावी होणारी मेंदूची झीज भरून काढली जाते आणि मेंदूची वाढ होते. ऑक्सङ्गर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यानुसार काही वनस्पतीं पासून डी.एच.ए. नावाचे पूरक अन्न तयार करण्यात आले आहे. रोजच्या आहारासोबत या पूरक आहाराची गोळी घेतली की, मेंदूतला हा दोष कमी होतो. मेंदूच्या ज्या भागात ही क्षमता वाढत असते त्या भागामध्ये डी.एच.ए. हे रसायन मोठ्या प्रमाणावर असते. या भागाचा ९० टक्के हिस्सा डी.एच.ए.ने व्यापलेला असतो आणि तोच विचार शक्ती वाढीस लावत असतो.

वाचनाने आणि चिंतनाने हे रसायन विकसित होत जाते, विपुलतेने तयार होते आणि त्यामुळे विचारशक्ती वाढते. आता शास्त्रज्ञांनी या शारीरिक क्रियेतून आपोआप तयार होणारे हे रसायन कृत्रिमरित्या तयार करून ते देण्याची प्रक्रिया शोधून काढली आहे. सुमारे ३५० मुलांवर प्रयोग करून या पूरक अन्न पदार्थाची उपयुक्तता सिद्ध करण्यात आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांवर हे प्रयोग करण्यात आले. त्यांची विचारशक्ती या गोळीमुळे वाढल्याचे आढळून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment