ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मारिया शारापोवा पराभूत

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सध्या अनपेक्षित व धक्कादायक निकालांचे सत्र सुरू आहे. रविवारी सेरेना विल्यम्सला बसलेल्या पराभवाच्या धक्क्यानंतर सोमवारी रशियाची अव्वल टेनिसपटू हिला पराभव पत्करावा लागला आहे. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारियाचा डॉमिनिका चिबुल्कोवा हिने ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला. या पराभवामुळे मारिया शारापोवाचे ऑस्ट्रेलियन ओपन मधील आव्हान संपुष्टात आले आहे.

शारापोवाला या सामन्यात पाठीच्या दुखापतीनेही त्रस्त केले होते. त्यासाठी तिला काही काळ वैद्यकीय मदतही घ्यावी लागली. मात्र त्यांधनतरही तिला पाठीच्या दुखापतीतून व्यूवस्थीत खेळता न आल्याीने पराभव सहन कराव लागला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन ओपनचया तिस-या स्पर्धेत सेरेनाने ३१ व्या मानांकित डॅनियला हंतुचोवाचा पराभव केला होता, मात्र त्यानतरच्या रविवरी झालेल्या सामन्यात सेरेनाचा धक्काादायकरित्या पराभव सहन करावा लागला आहे

दुसरीकडे सर्बियाच्या अॅना इव्हानोविकने स्टोसूरला ६-७, ६-४, ६-२ ने हरवले. टॉमस बर्डिचने बोस्नियाच्या दामीर जहूरला ६-४, ६-२, ६-२ने पराभव केला. आगामी काळात बर्डिचचा सामना १९ व्या मानांकित केविन अॅँडरसनशी होईल. दक्षिण आफ्रिकेच्या अॅँडरसनने फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वेस्लीनचा पराभव केला. या स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू युकीने धक्कादायक विजय मिळवला.

Leave a Comment