ऑटो एक्स्पोमध्ये ६९ नव्या गाड्या लाँच होणार

दिल्ली – नवी दिल्ली येथे ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल ६९ वाहनांची नवी मॉडेल्स पाच दिवसांच्या कालावधीत लाँच केली जाणार आहेत. सार्याह जगाचे लक्ष असलेल्या या एक्स्पोमध्ये भारताची लिडिंग कार उत्पादक कंपनी मारूती क्लच शिवाय असलेली सेलेरिओ ही कार सादर करणार आहे.

या एक्स्पोत सादर केलेल्या जाणार्‍या ६९ वाहनांमध्ये २३ कार आणि एसयूव्ही आहेत. २०१३ या वर्षात भारतात कार विक्री रोडावली असली तरी कार उत्पादक कंपन्यांनी मात्र कारला पुन्हा मागणी वाढण्याची आशा सोडलेली नाही. कार शौकीनांना या प्रदर्शनात दोन नवे ट्रेंड पाहायला मिळणार आहेत.

या प्रदर्शनात ४ नव्या छोट्या एसयूव्ही सादर होत आहेत. निस्सानच्या दात्सुनची गो आणि गो प्लस या दोन गाड्या सादर होत असून सात सीटची व्यवस्था असलेल्या या गाड्यांच्या किमती साडेपाच ते साडेसात लाख इतक्या आहेत.मारूती सुझुकी एसएक्स फोरच्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेली मारूती सुझुकी एड तसेच ह्युंडाईच्या ग्रँड आय१० प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या पाच सीटर कॉम्पॅक्ट कारचाही समावेश आहे. या गाडीचे डिझाईन आकर्षक आहे आणि ती २०१५ ला बाजारात येणार आहे. होंडाही लहान इनोव्हा प्रमाणे दिसणारी मोबिलियो ही गाडी सादर करत आहे. ही सर्व र्माडेल्स ७ ते १२ लाख रूपयांच्या दरम्यान आहेत.

या प्रदर्शनाचे आकर्षण म्हणजे मारूती सादर करत असलेली क्लचविरहित कार. या गाडीला गिअर आहेत मात्र क्लचची गरज नाही. हे तंत्रज्ञान फॉर्म्युला वन कारसाठी वापरले जाते. सेलेरियो नावाने ही गाडी बाजारात आणली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे चालकावरील ताण कमी होतो असे समजते.

Leave a Comment