डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा पाच महिन्यानंतरही तपास नाही

पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला सोमवारी पाच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र पाच महिने उलटूनही या हत्येाचा तपास करण्यामत अथवा आरोपीचा माग काढण्यापत पुणे पोलिसांना स्पतशेल अपयश आले आहे. त्यायमुळे सर्वसामान्याआतून पोलिसांच्यास कामगिरीबद़दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा अनेक वेळा करण्यात आला, पण प्रत्यक्षात परिस्थिती काही बदलली नाही. गेल्या पाच महिन्यापासून पोलिस तपास कामात काहीच प्रगती करू शकले नाहीत. आगामी काळात वेळ पडल्यास या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. मात्र हत्येचा तपास करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असून तपास पुणे पोलिसांनीच करावा, अशी भूमिका नरेंद्र दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे पोलिस आणि पर्यायाने गृहमंत्र्यांची या प्रकरणात चांगलीच गोची झाली आहे.

पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर २० ऑगस्ट रोजी नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची रेखाचित्र जारी केले. मात्र आता पाच महिने उलटूनही मारेकरी मोकाट असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना आहे. या घटनेचा तपास कधी लागेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.