सेरेना विल्यम्सचा विक्रमी विजय

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी विजय मिळवताना जगातील अव्वल क्रमांकाच्या असलेल्या सेरेना विल्यम्सने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ६१ वा विजय नोंदवून यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टने केलेला विक्रम मोडला आहे. त्यारसोबतच या स्पूर्धेत नोवाक योकोविकने डेनिस इस्तोमिनवर ६-३, ६-३, ७-५ ने मात करून चौथी फेरी गाठली.

ऑस्ट्रेलियन ओपनचया तिस-या स्पलर्धेत सेरेनाने ३१ व्या मानांकित डॅनियला हंतुचोवाचा पराभव केला. तिने स्लोव्हाकियाच्या खेळाडूला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले. सर्बियाच्या अॅाना इव्हानोविकने स्टोसूरला ६-७, ६-४, ६-२ ने हरवले. टॉमस बर्डिचने बोस्नियाच्या दामीर जहूरला ६-४, ६-२, ६-२ने पराभव केला. आगामी काळात बर्डिचचा सामना १९ व्या मानांकित केविन अॅँडरसनशी होईल. दक्षिण आफ्रिकेच्या अॅँडरसनने फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वेस्लीनचा पराभव केला.

या स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू युकीने धक्कादायक विजय मिळवला. त्याने मायकेल व्हीनससोबत पुरुष दुहेरीच्या सलामी सामन्यात जीन ज्युलियन-होरिया टेकाऊला ६-४, ६-४ ने पराभूत केले. यासह या जोडीने ६४ मिनिटांत दुस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला. पेस-रांदेक या पाचव्या मानांकित जोडीने लुकास डूल-रोलोसला ६-४, ६-१ने पराभूत केले.

Leave a Comment