महाराष्ट्राला रणजीच्या फायनलमध्ये जाण्याची संधी

इंदूर – कर्णधार रोहित मोटवाणीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईला पराभूत करून १७ वर्षांनंतर उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शनिवारपासून महाराष्ट्रा विरुद्ध बंगाल रणजी उपांत्य फेरीच्या लढतीस इंदूर येथे सुरूवात झाली असून या सामन्याात बंगाल संघला पराभूत करुन रणजीच्यास फायनलमध्येध जाण्यायची संधी चालून आली आहे. या संधीचा फायदा महाराष्राू्यचा संघ कसा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र् विरुद्ध बंगाल रणजी उपांत्य फेरीच्या लढतीस इंदूर येथे शनिवारपासून सुरू झाला आहे. १८ ते २२ दरम्यान होणा-या सामन्यासाठी महाराष्ट्रादचा १५ सदस्यीय संभाव्य संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. कर्णधार रोहित मोटवाणीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईला पराभूत करून १७ वर्षांनंतर उपांत्य फेरीत धडक मारली असल्याने त्यांचा आत्म्विश्वास वाढला आहे.

रणजी स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेला महाराष्ट्राेचा केदार जाधव आणि १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या डावात शानदार अर्धशतकी खेळी करणा-या अंकित बावणेने लढतीच्या पूर्वसंध्येला फलंदाजी करताना नेटमध्ये घाम गाळला. त्यामुळे आता सर्वांचे या उपात्यनफेरीच्याच सामन्यामकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या केदार जाधवने या सत्रात १ हजार ३४ धावा काढल्या असून यामध्ये ५ शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीवीर हर्षद खडीवाले यांनी ९४४ धावा करुन जबरदस्त फॉर्मात आहे. युवा खेळाडू अंकित बावणे आणि विजय झोल बंगालसाठी अडचणीचे ठरू शकतात. गोलंदाजीची मदार ३१ बळी घेणा-या अक्षय दरेकरवर असणार असून त्यामुळे या सामन्यात महाराष्ट्राचे पारडे जड आहे.

Leave a Comment