विजय झोलच्या खांद्यावर अंडर १९ वर्ल्ड कपची जबाबदारी

मुंबई: अबु धाबीत होत असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी जालन्याच्या विजय झोलवर सोपवण्यात आली आहे. विजय झोलची सध्याची कामगिरी पाहाता, भारताच्या या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. येत्याय १४ फेब्रुवारीपासून अबु धाबीत युवा विश्वचषकाला सुरुवात होत आहे.

टीम इंडियाची पहिलीच लढाई पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असेल. दुबईत १५ फेब्रुवारीला हा सामना रंगणार आहे. भारतीय संघात विजय झोलसह अखिल हेरवाडकर, सरफराझ खान आणि श्रेयस अय्यर या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताच्या युवा संघाने विजय झोलच्या नेतृत्त्वाखाली आशिया चषक जिंकण्याची कमाल केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयच्या दमदार फलंदाजीच्याक जोरावर भारताने सामना जिंकला होता. त्यानंतर मायदेशात परतल्यावर विजयने रणजी करंडकात महाराष्ट्राकडून खेळताना मुंबईविरुद्ध ९१ धावांची खेळीही साकारली. त्याचा हा सध्याचा फॉर्म लक्षात घेता विश्वचषकातही त्याच्याकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment