पोलीस अधिकारी अडचणीत

सामान्य जनता पोलिसांना घाबरते, त्यामुळे काही वेळा पोलीस अधिकारी मनमानी करतात आणि ती खपून जाते. सामान्य माणूस पोलिसांविरुद्ध कारवाई करायला कचरतो आणि पोलिसांची अरेरावी जारी राहते. आपले कोणीच काही वाकडे करणार नाही या भ्रमात असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना काही वेळा भान रहात नाही आणि ते अडचणीत येतात. सोलापूरमध्ये एक पोलीस अधिकारी आणि त्याचे दोन वरिष्ठ सहकारी असेच अडचणीत आले असून त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. कारण या पोलीस अधिकार्‍याने चक्क डॉक्टरलाच मारहाण केली आहे. गेेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांच्या संघटनांनी त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणार्‍या अशा मारहाणीच्या विरोधात कायदा करण्याची मागणी केली होती आणि ती मान्य होऊन आता तो कायदा झाला आहे. त्याचा पहिला बळी होण्याचा मान सोलापुरातल्या या पोलीस अधिकार्‍याला मिळणार आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कामावर असलेल्या एका डॉक्टरला आपल्या नेहमीच्या हडेलहप्पी शैलीनुसार केलेली मारहाण या पोलीस अधिकार्‍याला चांगलीच महागात पडत आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात बंद झाली असल्याने तो पुराव्यानिशी सापडला आहे.

हा प्रकार ३१ डिसंेंबरच्या मध्यरात्री घडला आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातल्या सगळ्या निवासी डॉक्टरांपर्यंत ही चित्रण जाऊन पोचले. हे चित्रीकरण सर्वांनी पाहिले आणि डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने ताबडतोब संप पुकारला. डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीच्या विरोधातला कायदा आता लागू झाला आहे. कोणा रुग्णाच्या नातेवाईकाने कामावर असलेल्या डॉक्टराला मारहाण केली तर त्या मारहाण करणारांना आधी अटक करावी असे या कायद्यात म्हटले आहे. या प्रकरणात सोलापूरच्या डॉक्टराला तर पोलीस अधिकार्‍यांनीच मारहाण केली आहे. त्यावर बराच आरडा ओरडा झाला पण सोलापूरच्या पोलीस यंत्रणेने संबंधित पोलीस निरीक्षक आणि त्याच्या दोघा सहकार्‍यांना सेवेतून निलंबित केले. एक पोलीस निरीक्षक कामावर असलेल्या सरकारी डॉक्टराला मारहाण करतो पण त्यावर काहीच कारवाई होत नाही असे दिसले तर डॉक्टरांची संघटना अधिकच संतप्त होईल म्हणून ही कारवाई करून पोलीस आयुक्तांनी हा संताप रोखण्याचा प्रयत्न केला पण आता डॉक्टरही मोठे जागरूक झाले आहेत. त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि नव्या कायद्यानुसार या पोलीस अधिकार्‍यांना अटक करावी अशी मागणीकेली.कायदा तसेच सांगतो. म्हणून न्यायालयाने अटकेचा आदेश दिला पण पोलीस यंत्रणा या तिघांना अटक करायला तयार नाही. पण न्यायालयाने कडक भूमिका घेतली. पोलिसांनी पोलीस अधिकार्‍यांना ताबडतोब अटक करावी असे सक्त आदेशच न्यायालयाने दिलेे. आता नाइलाजाने का होईना पण त्यांना अटक झाली आहे.

पोलिसांनी संगनमताने हे प्रकरण मिटवले असते, दाबले असते पण या घटनेचे चित्रण उपलब्ध असल्याने तशी काही संधी नाही. या प्रकरणात तिघाही पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. डॉक्टरांची संघटना (मार्ड) हे प्रकरण दाबू देईल असे काही दिसत नाही. गेली अनेक वर्षे मार्डने सातत्याने आंदोलन करून मिळवलेल्या या कायद्याचा बळी होण्याची पाळी सोलापुरातल्या एका पोलीस अधिकार्‍यावर येणार आहे आणि ही घटना मोठी ऐतिहासिक ठरणार आहे. या प्रकरणातला पोलीस निरीक्षक त्यात विनाकारण अडकलेला आहे. कारण त्याने केलेली मारहाण ही काही त्याच्या ड्यूटीचा भाग नव्हती. प्रसूती वेदनांनी विव्हळणारी एक ‘हिला मध्यरात्री दवाखान्यात दाखल झाली होती. तिथे एक डॉक्टर होता पण तो स्त्री रोग तज्ञ नव्हता. रेडिऑलॉजिस्ट होता. त्याने या ‘हिलेवर उपचार करावेत यासाठी त्या ‘हिलेचे नातेवाईक डॉक्टराशी हुज्जत घालत होते. ती ‘हिला महानगरपालिकेत दोन तास उपचार करून या सरकारी दवाखान्यात आली होती. आता अशा निर्वाणीच्या वेळी तिथे स्त्री रोग तज्ञ नसेल तर स्त्री रोग तज्ञाला पाचारण करणे हा उपाय आहे पण ही नातेवाईक मंडळी त्या रेडियॉलॉजिस्टलाच जबरदस्ती करीत होते. हा डॉक्टर आपली अडचण त्यांना सांगतोय पण या लोकांना हा फरक कळत नाही.या प्रकाराने तिथे वाद सुरू झाला आणि दुसर्‍याच एका अपघाताच्या प्रकरणात हे तीन पोलीस अधिकारी दवाखान्यात आले होते त्यांना इथे काही तरी गडबड सुरू आहे असे दिसले म्हणून ते तिथे चौकशी करायला आले.

चढलेले आवाज ऐकून ते या वॉर्डात दाखल झाले. एक ‘हिला प्रसव वेदनांनी विव्हळत आहे आणि डॉक्टर तिच्यावर काही उपचार करीत नाही हे बघून या पोलीस अधिकार्‍याने या डॉक्टरला मारहाण केली. त्या ‘हिलेच्या नातेवाईकांना रेडियॉलॉजिस्ट म्हणजे काय हे कळले नाही पण पोलीस अधिकार्‍याला तरी कळते का नाही ? पण त्याचीही वागणूक त्या नातेवाईकांपेक्षा वेगळी नव्हती. त्यात तो फसला. त्या डॉक्टरने त्या ‘हिलेवर उपचार करणे हे त्याचे कर्तव्य होते असे या लोकांचे म्हणणे आहे. आपण ते वादासाठी मान्यही करू पण कोणी आपले कर्तव्य बजावले नाही म्हणून त्याला त्याच जागेवर मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांंना नसतो ही साधी गोष्ट त्या पोलीस अधिकार्‍याला कळली नाही.

Leave a Comment