मुंबई- आगामी काळात होत असलेल्या लोकसभा त्यासोबतच राज्यसभा निवडणूक जागावाटपासंदर्भात शिवसेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक मुंबईत रंगशारदा येथे होत आहे. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे, असे समजते. त्याससोबतच येत्याप काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक हाच बैठकीचा मुख्य मुद्दा असणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून महायुतीमध्ये शिवसेना २२ आणि भाजप २६ हे जागा वाटपाचे सूत्र नक्की झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याआधी ९ जागा लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र महायुतीकडे त्यांच्या चार जागांचा आग्रह आहे. आरपीआयनंही महायुतीकडे सहा जागांची मागणी केली असून त्यांचचा तीन जागांसाठी आग्रह आहे. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्यांसोबतच येत्या काही दिवसांत राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यावेळी कोणत्या पक्षाने किती जागा लढायच्या या संदर्भात बैठकीचा चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवर निवडून देण्यात यावे यासाठी रिपाईनेते खासदार रामदास आठवले युतीच्या नेत्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.