विना अनुदानित सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांने कपात

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती उतरल्याने आगामी काळात आता विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांने कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवे दर फेब्रुवारी महिन्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे महागाईने होरपळत चाललेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा लाभणार आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितलं आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच नववर्षाची भेट म्हणून विना अनुदानित गॅसच्या किंमतीमध्ये २२० रुपये अशी भरघोस वाढ करण्यात आली होती. ज्यामुळे सरकारबद्दलची नाराजी आणखी वाढली होती.

आता विना अनुदानित गॅस सिलेंडरचे दर शंभऱ रुपयाने का होईना पण कमी झालेत. पण ही दरकपात म्हणजे निवडणूक जवळ आल्याचा संकेत तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जात आहे. नवे दर हे पुढच्या माहिन्यापासून म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे महागाईने होरपळत चाललेल्यान सर्वसामान्य नागरिकांना यामुळे दिलासा लाभणार आहे.

Leave a Comment