भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ जगाचा लाडका!

लंडन – नुकतंच लंडनमधल्या ह्ययुगोवह्ण या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पाचवा क्रमांक पटकावलाय. अर्थातच, केवळ भारतातील सर्वेक्षणात मात्र मास्टर ब्लास्टरलाच पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं. युगोवनं या यादित जगभरातील ३० प्रशंसनीय व्यक्तींचा उल्लेख केलाय.

ही यादी तयार करण्यासाठी या संस्थेनं तब्बल १३ देशांमध्ये चाचणी घेतली होती. यात ह्यमायक्रोसॉफ्टह्णचे बिल गेटस् यांना पहिल्या क्रमांकावर स्थान मिळालंय. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना दुसरा तर तर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळालंय. या यादीत सहा महिलांचाही समावेश आहे. यादीमधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा १३ व्या स्थानावर आहेत.

या ३० जणांमध्ये सात भारतीयांनी स्थान पटकावलंय. सचिन तेंडुलकर पाचव्या, नरेंद्र मोदी सातव्या, अमिताभ बच्चन नवव्या, ए. पी. जे अब्दुल कलाम दहाव्या, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चौदाव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अठराव्या, तर उद्योगपती रतन टाटा तिसाव्या स्थानावर आहेत.

Leave a Comment