सोनीने आणला अल्ट्रा शॉट थ्रो प्रोजेक्टर

सिनेमा पाहण्यासाठी आता मल्टीप्लेक्समध्ये जाण्याची आणि तिकीटांसाठी बारी लावण्याची वेळ प्रेक्षकांवर येणार नाही. इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी सोनीने या कामी तुम्हाला मदतीचा हात देऊ केला आहे. घरबसल्या मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्याचा आनंद कंपनीच्या अल्ट्रा शॉट थ्रो प्रोजेक्टरमुळे तुम्ही मिळवू शकता. हा नवा प्रोजेक्टर कंपनीने कंझ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो मध्ये सादर केला आहे.

फोर के अल्ट्रा एचडी प्रोजेक्टरच्या मदतीने तुम्ही घरातील कोणत्याही भिंतीला सिनेमा स्क्रीन बनवू शकणार आहात. हा प्रोजेक्टर टांगण्याची अधवा ऊंच जागी ठेवण्याचीही गरज नाही. तीसमोर ठेवला की काम झाले. या प्रोजक्टरला अन्य चार पोर्ट दिली गेली आहेत. त्यावर मोबाईल, डीव्हीडी, टॅब्लेट अथवा पेनड्राईव्हही जोडता येतो. याची किमत १८ ते २४ लाख रूपयांच्या दरम्यान असून तो मे जूनमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. यासाठी असलेल्या स्क्रीनचा साईज १४७ इंचापर्यंत असून तो अधिक वाढविता येतो. अल्ट्रा शॉर्ट थ्रो होम थिएटर असे त्याचे नामकरण केले गेले आहे.

Leave a Comment