नोकरी सोडायचीय? वापरा क्वीट युवर जॉब अॅप

बरेच वेळा असे होते की नोकरीचा प्रचंड कंटाळा आलेला असतो. कुठल्याही क्षणी नोकरीवर लाथ मारावी असे मनापासून वाटत असते मात्र बॉससमोर हे सांगण्याची हिम्मतच होत नाही आणि मग कितीही त्रास होत असला तरी नोकरी सोडता येत नाही. तुमच्याबाबतीतही हीच अडचण आहे काय? मग तुमच्या मदतीसाठी क्वीट युवर जॉब हे अॅप तयार आहे.

या अॅपमध्ये नोकरी सोडण्यासाठी बॉसला कसा टेक्स्ट  मेसेज पाठवायचा याचा सल्ला दिला आहे तसेच मसेजचे अनेक नमुनेही तुमच्यासाठी तयार ठेवले गेले आहेत.त्यापैकी आपल्याला योग्य वाटेल तो मेसेज निवडायचा आणि बॉसला पाठवून नोकरी सोडायची. उदाहरण द्यायचे तर आय अॅम सिक ऑफ कार्पोरेट वर्ल्ड, आय वाँट टू गेट रिच किवा आय फाऊंड न्यू जॉब अशा प्रकारचे अनेक मेसेज यात आहेत.

याच कंपनीने पूर्वी ब्रेक अप टेक्स्ट हे अॅपही बाजारात आणले असून त्याच्या मदतीने नको असलेले नाते तोडणे सहज शक्य होते. ही अॅप आयटून्स स्टोअरमध्ये उपलब्ध असून ती डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टीम किमान ६.१ वा त्यापेक्षा अधिक क्षमतेची असणे आवश्यक आहे.