फ्ल्यूवर नवे औषध

कॅनडात सुरू असलेल्या काही संशोधनातून फ्ल्यू वर नवे औषध सापडण्याची शक्यता दिसायला लागली आहे. मानवतेच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी ठरणार आहे कारण आजवर या व्हायरसजन्य आजारावर औषध सापडलेले नाही. या व्हायरसचा हल्ला झाला की अंग मोडून येते, ताप येतो, थंडी वाजून येते. ङ्गार अपवादात्मक प्रकरणांत मृत्यू ओढवतो. फ्ल्यू होणारांना काही दिवसांनी आपोआप आराम पडतो पण दरम्यान केवळ लक्षणांवर औषधे दिलेली असतात. हा आजार दुरुस्त व्हावा असे औषध अजून सापडलेले नाही. सायमन ङ्ग्रेझर यनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या व्हायरालॉजी विभागातील संशोधक मासाहिरो निकुरा यांनी एक मॉलिक्यूल शोधून काढला आहे.

सध्या या आजारावर तामीफ्ल्यू हे औषध वापरले जाते आणि ते काही प्रमाणात उपयुक्त आहे पण अन्य अनेक औषधांप्रमाणे ते आता निष्प्रभ होत आहे. त्याची जागा घेईल आणि त्यापेक्षा प्रभावशाली असेल असे नवे औषध शोधण्याची गरज दिसायला लागली होती. ती आता पूर्ण होत आहे. फ्ल्यूच्या प्रसारास न्यूरामिनिडेस या एन्झाइमची निर्मिती आणि त्याची शरीरात होणारी प्रक्रिया कारणीभूत ठरत असते पण आता नव्याने शोधून काढण्यात आलेल्या परमाणूमुळे न्यूरामिनिडेसची निर्मिती बाधित केली जाणार आहे. सायन्स एक्स्प्रेस या मासिकात ही माहिती देण्यात आली आहे. या नव्या औषधाचे नाव रिलेन्झा असे आहे. न्यूरामिनिडेस हे एन्झाईम तयार झाले की ते सायलिक ऍसिड मध्ये विरघळते आणि त्यातून निर्माण होणार्‍या द्रव्यांमुळे फ्ल्यू होतो. रिलेन्झा मुळे न्यूरामिनिडेसचे सायलिक ऍसिडमध्ये विरघळणे रोखले जाते. हे नवे औषध पाण्यात सहजपणे विरघळते.

फ्ल्यूच्या प्रसाराची प्रक्रिया रुग्णाच्या घशात सुरू होते. आणि तेथेच हे औषध काम करायला सुरूवात करते.म्हणजे ते औषध किंवा गोळीच्या स्वरूपात तोंडातून घेता येते. त्याचे इंजेक्शनदेण्याची गरज नाही आणि ते औषध सलाइनमधून देण्याचीही आवश्यकता नाही म्हणून ते सोप आणि अधिक परिणामकारक ठरते असाही दावा निकुरा यांनी केला आहे. तामिफ्ल्यू हे औषध पाण्यात विरघळत नाही त्यामुळे त्याला मर्यादा पडल्या आहेत , ते सोपे नाही. ती मर्यादा आता नव्या औषधात नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment