कॉमेडी नाईट्सचा कपील शर्मा अडचणीत

मुंबई: कॉमेडी नाईट्स विथ कपिल फेम, कपिल शर्मा आता अडचणीत आला आहे. कारण गर्भवती महिलेची टर उडवल्याप्रकरणी, कपिल शर्माला राज्य महिला आयोगाने नोटीस धाडली आहे. आता कपिल शर्मा राज्य महिला आयोगाने कारणे दाखवा नोटीसला काय उत्तयर देता याच्याीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबतची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी दिली. कपिल शर्मासह कलर्स वाहिनीलाही नोटीस पाठवण्यात आली. कपिलने या शोच्या एका एपिसोडमध्ये गर्भवती महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. पाच जानेवारीला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, कपिलने ‘रस्त्यावरील खड्डे इतके जास्त आहेत की एखादी गरीब महिला रस्त्यातच बाळंत होईल’ अशी टिप्पणी केली होती.

यासंदर्भात ‘कायद्याने वागा’ संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांची भेट घेतली आणि शोवर कारवाईची मागणी केली. या शोमध्ये सहभागी होणा-या नवज्योत सिंग सिद्धूनेही टिंगल केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment